गणपतीपुळे येथे जाणार्‍या मारूती कारला अपघात ५ प्रवासी जखमी

नाणीज ः कोल्हापूरहून गणपतीपुळ्याकडे मारूती कारने निघालेल्या भक्तांची गाडी चोरवणे फाट्यानजिक एका झाडावर आदळून झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत.
कोल्हापुरातील काही भाविक मारूती कारने गणपतीपुळ्याला निघाले होते. अचानक चोरवणे फाटा ते नाणीजदरम्यान असलेल्या एका भल्यामोठ्या झाडावर त्यांची कार आदळली. त्यामध्ये ५ जण जखमी झाले. चालक गणेश शंकर मोरे (३२, रा. माररूळ, हवेली पुणे) याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला असून चेहर्‍याला मुका मार लागला आहे. तर श्रीधर आत्माराम कुमटे (६२, मुंबई मालाड), अलका श्रीधर कुमटे (५२), नितीन नारायण कुमटे (६०) आणि अस्मिता नितीन कुमटे (५९) हे प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ अपघातस्थळावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button