आ. हुस्नबानू खलिफेंनी अर्जुना मध्यम प्रकल्पग्रतांच्या समस्यांबाबत शासनाचे लक्ष वेधले

राजापूर ः महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार ऍड. हुस्नबानू खलिफे यांनी राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत विशेष उल्लेख सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले.
राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पग्रस्तांचे सुयोग्य पुनर्वसन झाल्याचा प्रशासन दावा करीत आहे. मात्र येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना अपुर्‍या सुविधांमुळे अनेक समस्या व अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेली अनेक वर्षे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनामधील एकूण १८ नागरी सुविधांची पूर्तता करण्याची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button