
पेपर मिलमधील कामगाराचा आकस्मिक मृत्यू
चिपळूण ः खेर्डी औद्योगिक वसाहतीतील पेपर मिलच्या कामगाराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
दिपक भिकू आदवडे (५०) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत निलेश रघुनाथ खोपडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दीपक आदवडे हे पेरर मिलमध्ये कामाला असून त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांच्या तोंडातून फेस आल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले.