
कणकवली तालुक्यातील पुरग्रस्त परिस्थितीचा आमदार नितेश राणेंकडून आढावा, मदतीसाठी यंत्रणा उपलब्ध करून दिली
कणकवली ः रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अतीवृष्टी होत असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील पुरग्रस्त स्थितीचा आढावा आ. नितेश राणे यांनी घेतला. या ठिकाणी जैनवाडीतील काही ग्रामस्थ पुराच्या वेढ्यात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नव्हती. ही परिस्थिती नितेश राणे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या ग्रामस्थांना सोडविण्यासाठी इंजिन बोट व त्याचा तज्ञ चालक उबलब्ध करून दिला आहे. तसेच उंबरडे भागातील एक तरूण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याच्या शोधासाठी त्यांनी स्कुबा डायव्हिंगचे पथकही पाठविले आहे. आ. नितेश राणे यांनी तहसिलदार व अन्य सरकारी यंत्रणेशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून ग्रामस्थांना मदत उपलब्ध करून दिली जात आहे.
www.konkantoday.com