अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आशा, गटप्रवर्तकांची निदर्शने
रत्नागिरी ः अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी आशा व गटप्रवर्तक महिला जिल्हा परिषदेवर धडकल्या. यावेळी निदर्शने करून आपल्या मागण्यांचे निवेदन अतिरिक्त मुख्याधिकारी रघुनाथ बामणे यांना देण्यात आले.
जिल्ह्यात सुमारे १२५० आशा आणि गटप्रवर्तक महिला काम करत आहेत. आशा व गटप्रवर्तक महिलांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ७३ पेक्षाही जास्त कामे करावी लागतात. याशिवाय आणि ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही अशीही ११ कामे सक्तीने आशांच्याकडून करवून घेतली जातात. ही सर्व कामे करण्यासाठी आशा व गटप्रवर्तक महिलांना दररोज ८ तासापेक्षाही जास्त वेळ काम करावे लागते. त्या कामाचा मोबदला मात्र दरमहा सरासरी अडीच हजारापेक्षाही कमी मिळतो.