कसबा येथील संभाजीराजे स्मारकाचे काम गुणवत्तेने करा ः जिल्हाधिकारी
रत्नागिरी ः संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावी धर्मवीर संभाजीराजे स्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. यासाठी जुने दगड वापरून स्मारकाचे काम उत्तम गुणवत्तेने करा असे आदेश जिल्हाधिकारी श्री. सुनिल चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
नियोजन समितीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलेल्या विविध विकासकामांपैकी पूर्ण झालेल्या, अपूर्णावस्थेतील कामांचा आढावा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य इमारत प्रसाधनगृहाच्या कामाची तपासणी करा, देवरूख लांजा येथील शवविच्छेदन इमारतींची दुरूस्ती, माचाळ पर्यटन क्षेत्र विकास आराखडा, संगमेश्वर आयटीआयकडे जाणार्या रस्त्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. सुनिल चव्हाण यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत.