
इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोचिवली एक्स्प्रेस करबुडे बोगद्यात अडकली
रत्नागिरी ः भारतातील सर्वात मोठ्या करबुडे बोगद्यात कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही गाडी जवळजवळ पाऊण तास बोगद्यात थांबवावी लागली. बोगद्यात गाडी अडकल्याची घटना कळल्यानंतर कोकण रेल्वेने दुसरे इंजिन मागवून कोचिवली एक्सप्रेसला संगमेश्वर स्थानकात नेण्यात आले. गाडी बोगद्यात आल्याने गाडीतील काही प्रवाशांना श्वसनाचा त्रास झाला. त्यांच्यावर प्रशासनाच्यावतीने उपचार करून सोडण्यात आले. या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती.