विज वितरण कंपनीच्या बेपर्वाईमुळे कोतापुरात बारा वीज खांब एकाचवेळी कोसळले, परिसर अंधारात
राजापूर ः तालुक्यातील नवरे वठार ते सुतारवाडी येथील विजेचे तब्बल बारा खांब अचानक उन्मळून पडल्याने या गावचा विद्युत पुरवठा ठप्प झाला आहे. दरम्याने जीर्ण झालेले बहुतेक वीजखांब पडण्याची भीती ग्रामस्थांनी वारंवार व्यक्त केली होती. शिवतेज या गावच्या संस्थेमार्फत पाहणी करून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना याची कल्पना देखील देण्यात आली होती. मात्र अधिकार्यांकडून डोळेझाक करण्यात आल्याने अखेर घाऊक खांब मोडून पडल्याने सध्या या भागातील जनतेवर काळोखात राहण्याची वेळ आली आहे