क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला; क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन


लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.१९८३ ते आता पर्यंतचे सर्व क्रिकेट वर्ल्ड कपचे द्वारकानाथ संझगिरी यांना वार्तांकन केलंय.भारतरत्नं सचिन तेंडुलकर , लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांचे ते जवळचे स्नेही होते.द्वारकानाथ संझरगिरी यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेट मराठमोळे समालोचक हर्षा भोगले यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केलीय. त्यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. हर्षा भोगले आणि द्वारकानाथ संझगिरी हे अनेक दशकांपासूनचे मित्र होते. मित्राच्या निधनानंतर हर्षा भोगलेंनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आठवणी जगासमोर मांडल्या आहेत.द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालंय. पेशानं सिव्हिल इंजिनीयर असलेले द्वारकानाथ संझगिरी मुंबई महापालिकेमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. त्यांनी क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीनं क्रिकेट समीक्षक घडवला. मराठी क्रिकेटरसिकांनी नेहमीच त्यांच्या लिखाणाला दाद दिलीय. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button