
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खेडमधील मालमत्तेच्या मूल्यांकनासाठी अधिकारी दाखल
कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम यांच्या खेड तालुक्यातील मुंबके गावातील मालमत्तेचा लिलाव होणार आहे .मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकाऱ्यांची एक टीम दाखल झाली आहे. एनटी स्मगलिंग एजन्सीचे अधिकारी जोसेफ, प्रवीण गजबिजे व योगेश कुमार हे मुमके गावात दाखल झाले असून त्यांनी या मालमत्तेची पाहणी केली .१९९३ साखळी बॉम्बस्फोटानंतर हा बंगला ओस पडला आहे.सध्या या बंगल्याची अवस्था जीर्ण व पडकी झाली आहे. या मालमत्तेचे मूल्यांकन झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. मुंबईसह अन्य भागात असलेल्या दाऊदच्या मालमत्तेवर याआधीच टाच आणण्यात अाली आहे.