
डबल डेकर एक्सप्रेस आता रात्रीच्या वेळी
कोकण रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळी धावणाऱया डबलडेकर एक्स्प्रेसचा शनिवारपासून शुभारंभ करण्यात आला .मुंबईतून रात्रीच्या वेळी कोकणात येणाऱ्या गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने रात्रीच्या प्रवासासाठी देखील डबलडेकर सेवा सुरू केली आहे .
कोकण रेल्वे मार्गावर दिनांक ६ डिसेंबर २०१५ पासून डबलडेकर वातानुकूलीत गाडी धावत आहे.गाडीत केवळ बसून प्रवास करण्याची सोय असल्याने रेल्वेकडून ही गाडी केवळ दिवसांच्या प्रवासासाठी चालवली जात होती .मात्र आता ही गाडी रात्रीच्या प्रवासासाठी देखील सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.ही गाडी दर शनिवारी मुंबईतून लोकमान्य टिळक टर्मिनन्स रात्री १.१० सुटेल व त्याच दिवशी दुपारी १वा मडगावला पोहोचेल.परतीच्या प्रवासात मात्र ही गाडी दुपारीच धावणार आहे.
www.konkantoday.com