
निवे आरोग्य केंद्रासाठी सुरेश पाटोळे यांनी दिली स्वमालकीची जागा
देवरूख ः निवेखुर्द गावातील सुरेश पाटोळे यांनी स्वमालकीची एक एकर जागा देण्याचे औदार्य स्विकारल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राला हक्काची जागा मिळण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
निवे खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार गेले अनेक महिने जिल्हा परिषद मालकीच्या शाळेतून तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सौ. वेदा फडके यांनी आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी स्वमालकीची जागा मिळावी यासाठी अथक प्रयत्न केले होते. निवे खुर्द गावात रहावे यासाठी विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ. मुग्धा जागुष्टे, सरपंच बापू चव्हाण यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेवून प्रयत्न सुरू केले होते. गावातील निवृत्त मंडल अधिकारी सुरेश पाटोळे यांनी आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी एक जागा देण्याचे मान्य केले आहे.