
आयएएस अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांच्या मुलीची लिपी रस्तोगीची आत्महत्या
महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांच्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लिपी रस्तोगी असं मुलीचं नाव असून ती २७ वर्षांची होती.मंत्रालयासमोरील सुनीती इमारतीत रस्तोगी कुटुंब वास्तव्याला आहे. तिथंच हा प्रकार घडला आहे. लिपी हिच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. घरात सुसाइड नोट सापडल्याचंही सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपासाला सुरु केला आहे. विकास रस्तोगी हे राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आहेत. त्यांच्या पत्नी राधिका रस्तोगी या चलन विभागात सचिव आहेत.www.konkantoday.com