एमआयडीसीची आजपासून पाणी कपात, दोन दिवस आड पाणीपुरवठा
रत्नागिरी ः एमआयडीसीमार्फत रत्नागिरी पालिकेच्या काही भागासह दहा ग्रामपंचायती क्षेत्रात १३ जूनपासून दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामीण, शहरी भागातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनला आहे.
एमआयडीसीमार्फत रत्नागिरी पालिकेच्या काही प्रभागासह झाडगांव औद्योगिक क्षेत्र, मिरजोळे, शिरगांव, मिर्या, नाचणे, कुवारबांव, पोमेंडी, कर्ला, टिके, चिंद्रवली ग्रामपंचायत क्षेत्र, काही खाजगी ग्राहकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. महामंडळाची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाच्या शिपोशी धरणातील पाणी घेण्यात येते. शिपोशी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे.