टेम्पोला मागून धडक दिल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू

0
100

आरवली ः उभ्या असलेल्या टेम्पोला पाठिमागून धडक देणारा दुचाकीस्वार दत्ताराम भिकाजी मुदगल (२५) या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात कासे पुलाजवळ घडला. दत्ताराम भिकाजी मुगदल, अंकुश महादेव मुदगल हे दोघेजण मोटरसायकलवरून माखजनहून आपल्या नारडुवे मधलीवाडी गावी जात होते. कासे पुलाजवळ उभ्या असलेल्या टेम्पोचा अंदाज दुचाकीस्वार दत्ताराम मुदगल याला आला नाही. टेम्पोच्या मागील बाजूस मोटरसायकलची जोराने धडक बसल्याने मुदगल याचा जागीच मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here