कायमस्वरूपी मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी ग्रॅव्हीटी पाणी योजनेसाठी लवकरच निविदा

0
81

चिपळूण ः कोळकेवाडी धरणातून शहरात राबविण्यात येणार्‍या ग्रॅव्हीटी पाणी योजनेच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत महत्वाची बैठक झाली. त्यानुसार येत्या आठ दिवसात या योजनेच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजूरी दिली जाईल आणि विधानसभा निवडणुकीआधी या योजनेची निविदा प्रसिद्ध केली जाईल असा विश्‍वास नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी व्यक्त केला आहे. सध्या शहरात मचूळ पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेतल्यास ग्रॅव्हीटी पाणी योजना तितकीच महत्वाकांक्षी ठरणार आहे. कायमस्वरूपी मुबलक पाणी व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने ही योजना तितकीच फायदेशीर ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here