खेर्डी परिसरातील मासळी, मटण विक्रेत्यांकडून वाशिष्ठी नदीत टाकावू कचरा टाकल्याने नदीत प्रदूषण
चिपळूण ः परिसरातील खेर्डी येथे मासळी व मटण, चिकन विक्रेते आपला उरलेला कचरा वाशिष्ठी नदीच्या पात्रात टाकतात. यामुळे नदीचे पाणी दुषित होते व हे पाणी चिपळूण शहरातील व खेर्डी येथील नागरिक पित असल्याने काही वेळा साथीचे आजार बळावतात. काही वेळा नदीपात्रात कचरा टाकू नये अशी मागणी राष्टीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनी केली आहे.
चिपळूण शहर परिसरात अनेक चिकन, मटण व मच्छी विक्री केली जाते. खेर्डी व बहाद्दूरशेख नाका परिसरात मटण व चिकनची विक्री होते. येथे मच्छीही विकली जाते. याचा कचरा हे विक्रेते साठवून ठेवतात व रात्रीच्या वेळी वाशिष्ठी नदीपात्रात हा कचरा टाकला जातो. यात मांसाचे टाकावू भाग कुजतात व त्यामुळे पाणी प्रदूषित होते. या नदीतून खेर्डी व चिपळूण शहराला पाणी पुरवठा केला जातो. वारंवार केरकचरा टाकल्याने नदीचे पाणी दुषित होते. यातून साथीचे आजार बळावतात व नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. परिणामी हे टाकावू पदार्थ या नदीपात्रात टाकण्यात येवू नये अशी मागणी जनतेतून होत आहे.