
स्टॉपवर बस थांबविली नाही या रागाने केली चालकाला मारहाण
रत्नागिरी ः विजापूर ते रत्नागिरी या एस.टी. मधून प्रवास करणार्या प्रवाशांना जयस्तंभ येथे बेल देऊनही एस.टी. चालकाने न थांबविल्याने त्याच्या केबिनमध्ये जावून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
लांजा डेपोचे चालक सचिन शिंदे हे विजापूर ते रत्नागिरी ही एस.टी. घेवून रत्नागिरीला येत होते. त्यावेळी एका प्रवाशाने गाडी थांबविण्यासाठी बेल दिली. परंतु त्यांनी जयस्तंभ येथे गाडी न थांबविता एसटी स्टँड येथे थांबविली. यामुळे हा प्रवासी संतापला. त्याने एस.टी.च्या केबिनमध्ये जावून शिंदे यांना शिवीगाळ करत मारहाण केली.