
आंबा घाटात कळकदर्याजवळ बाजूची डोंगराची माती रस्त्यावर आल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प.
मिर्या-नागपूर रस्त्याच्या कामावरून माजी खासदार विनायक राऊत यांनी टिका केली असतानाच जोरदार पावसात मिर्या-नागपूर रस्त्याच्या कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्या रत्नागिरी साळवीस्टॉप ते हातखंबा या रस्त्यावर मिर्या-नागपूर रस्त्याचे काम सध्या अर्धवट अवस्थेत आहेत. एका बाजूने कॉंक्रीटीकरण सुरू असल्याने अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी होत आहे. पूर्वीच्या जेके फाईल्स कंपनीजवळ वारंवार कोंडी होत आहे.
या मार्गावरील आंबा घाटात देखील डोंगर फोडून रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु हे डोंगर खोदताना अनेक ठिकाणी केवळ माती ढकलून देण्यात आल्यामुळे पावसाची सुरूवात होताच ही माती आता रस्त्यावर येवू लागली आहे. आज आंबा घाटात कळक दर्याजवळ कॉंक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर बाजूच्या डोंगराच्या मातीचा ढिगारा खाली आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यंत्रणेने ही माती बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू झाली. मात्र आता भर पावसाळ्यात आंबा घाटातून प्रवास करताना वाहन चालकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.www.konkantoday.com