अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कर्नाड यांचे निधन
बेंगलुरु :प्रख्यात नाटककार, साहित्यिक, अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कर्नाड यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून कर्नाड यांच्यावर उपचार सुरु होते. बेंगलुरु येथील राहत्या घरी त्यांचे आज सकाळी निधन झाले. कन्नडबरोबरच मराठी नाटक, चित्रपटात काम केले. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्युटचे संचालक म्हणून त्यांनी भरीव काम केले होते. कलावंताबरोबरच एक विचारवंत म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला होता. कोणाची तमा न बाळगता ते आपल्याला वाटणा गोष्ट, भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडत असत.
www.konkantoday.com