स्वकीयांनीच विश्‍वासघात केला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांची टीका

चिपळूण ः खेर्डीतील जनतेने २० वर्षे जो विश्‍वास आमच्यावर दाखवला आणि एकहाती सत्ता दिली. त्याला आमच्या पाच सहकार्‍यांनी व विरोधी गटानेही काळीमा फासण्याचे काम केले आहे. तेव्हा त्यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेला अविश्‍वास ठराव हा तर विश्‍वासघातकी ठराव असल्याचा टोला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खेर्डी ग्रा. पं. मधील १७ सदस्यांपैकी १४ सदस्यांनी जयंद्रथ खताते यांच्या पत्नी व सरपंच सौ. जयश्री खताते यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव नुकताच तहसीलदार जीवन देसाई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. येत्या ७ दिवसात याविषयी विशेष सभेचे आयोजन करून सदस्यांचे मतदान घेतले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button