सरकारी कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याने नैराश्येपोटी शिक्षिकेची आत्महत्या
देवरूख ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका श्रीमती शुभदा दत्ताराम सोलकर (५०) यांनी आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर गळफास लावून आत्महत्या केली.
पती दत्ताराम सोलकर यांचे आठ महिन्यापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाल्याने त्या मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या. पतीची पेन्शन सुरू व्हावी यासाठी शुभदा सोलकर यांचा पाठपुरावा सुरू होता. सातत्याने पाठपुरावा करूनही पतीची पेन्शन सुरू न झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.