
फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दहा गावांतील कोरोना विलगीकरण कक्षासाठी मदत
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने गावागावांत विलगिकरण कक्ष सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर फिनोलेक्स इंडस्ट्रीज व सीएसआर पार्टनर मुकल माधव फाउंडेशनने आसपासच्या दहा ग्रामपंचायतींना या कक्षासाठी अत्यावशक अशी वस्तूरूप मदत दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड व जि. प. आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते कंपनी परिसरातील भाट्ये , फणसोप, कोळंबे, गोळप , पावस, पूर्णगड, मेर्वी, गणेशगुळे,गावखडी आणि शिरगाव ग्रामपंचायतींना ही सामग्री वितरित करण्यात आली.
या मदतीचे स्वरूप प्रत्येक ग्रामपंचायतीला १० बेड, गाद्या, उशा, कव्हर्स, बेडशीटस, सोलापुरी चादरी, तसेच १०० किलो तांदूळ आणि २५ किलो तुरडाळ असे स्वरूप होते. कंपनीने कोविड काळात केलेल्या कामाची माहिती दिली. कोविडशी लढा देताना फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने जिल्हा प्रशासनाला कोविड काळात १६ सुसज्ज आयसीयू बेड, सलाईन स्टँड, मल्टीपॅरा मॉनिटर, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स आणि एचएफएनओ मशीन आणि १७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत.
जि. प. आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले की, जिल्ह्यात आता बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. पण ज्यांना लक्षणे दिसत आहेत त्यांनी तत्काळ तपासणी करून घ्यावी म्हणजे उपचार सुरू होऊन बरे होता येईल. याकरिता गावागावांत विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. याकरिता फिनोलेक्सने खूप मदत दिल्याबद्दल आभार मानले .
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड व जि. प. आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी कोविड १९ या परिस्थितीत निरंतर पाठिंबा दिल्याबद्दल मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्थ सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांचे आभार मानले.
www.konkantoday.com