लोकप्रतिनिधिंसमोर आश्वासने देवूनही मागण्यांकडे दुर्लक्ष कोकण रेल्वे कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचे उपोषण
रत्नागिरी ः प्रलंबित मागण्यांकडे महामंडळाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी १० जूनपासून बेलापूर कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, विनायक मुकादम यांनी सदर निर्णयाची माहिती दिली. कोकण रेल्वेच्या अधिकार्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांवर सातत्याने अन्याय केला आहे.