
मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात हटवलेल्या टपरीधारकांना नुकसान भरपाई मिळणार.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अनेक गोरगरीब व्यावसायिकांचे व्यवसायाचे खोके, टपर्या हटवण्यात आल्या. व्यावसायिकांना नुकसान भरपाईची मागणी केली होती. यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार किरण सामंत यांनी केंद्रस्तरावर पाठपुरावा केला आणि त्याला यश आले आहे. पहिल्या टप्प्यात आरवली, तुरळ, माभळे, वांद्री या चार गावातील २० जणांना ६४ लाख ७५ हजाराहून अधिक रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. २४ जानेवारीला याचे वितरण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
.मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्ष सुरू आहे. यासाठी संपादित करण्यात आलेली जागा, घरे आदी खातेदारांना ९० टक्केपेक्षाहून अधिक मोबादला मिळाला आहे; मात्र काही ठिकाणी अनेक वर्ष छोटे-मोठे व्यवसाय महामार्गालगत करणार्या खोके व टपरीचालक या भरपाईपासून वंचित राहिले होते.