रस्त्याच्या दुरूस्तीसाठी गुहागरात शिवसेनेचे रास्तारोको

गुहागर ः गुहागर-चिपळूण मार्गावरील मोडकाआगर ते शृंगारतळी हा रस्ता पूर्णपणे उखडला असून त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्डे ५ जूनपूर्वी न भरल्याने गुहागर शहर शिवसेना, युवासेना यांच्यावतीने मोडकाआगर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या दणक्याने राष्ट्रीय महामार्ग कार्यालयामार्फत येत्या ४-४ दिवसात डांबरीकरण करण्याचे पत्र देण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर ते शृंगारतळी या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रास करताना वाहन चालकांना व पादचार्‍यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button