नंदकुमार पटवर्धन यांच्या आसमंत फाऊंडेशनच्यावतीने रत्नागिरीत सुरू होणार फुलपाखरू उद्यान
रत्नागिरी ः रत्नागिरीमध्ये फुलपाखरांच्या अनेक प्रजाती आढळतात. परंतु एकाच ठिकाणी पुलपाखरे पाहण्याचा आनंद रत्नागिरीकरांना घेता येणार आहे. आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशनच्या एमआयडीसीतील आसमंत ट्री पार्कमध्ये फुलपाखरू उद्यान साकारण्यात येणार आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची झाडे लावली जाणार असून अर्बन बायो डायव्हर्सिटी ग्रुपचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती आसमंतचे संचालक, उद्योजक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.
आसमंतने एमआयडीसी येथील जागेमध्ये वनस्पती उद्यान सुरू केले आहे. येथे देशी झाडांच्या प्रजांतींची लागवड केली आहे. हळुहळू हा प्रकल्प आकार घेत आहे. येथे लवकरच फुलपाखरू उद्यान ठाणे शहरी जैवविविधता ग्रुपच्या सहकार्याने सुरू होणार आहे.
आसमंत बेनेवोलन्स फाऊंडेशन आणि ठाणे येथील शहरी जैवविविधता ग्रुपच्यावतीने ९ जून रोजी सकाळी १० वा. मारूती मंदिर येथील हॉटेल कार्निवल येथे पर्यावरण जागृतीविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आसमंतच्या वनस्पती उद्यान आणि फुलपाखरू उद्यानाविषयी माहिती दिली जाणार आहे.