
जन्मदात्या आईचा मुलाने केला खून
दापोली तालुक्यात मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा खून केल्याची घटना घडली आहे. रागाच्या भरात त्याने तीच्या मानेवर कोयत्याने वार करून तिला ठार मारले.दापोली तालुक्यातील गणपतीपुळे पश्चिम वाडी येथील राहणारा अरुण गंगाराम इंदुलकर (४३)हा आपली आई शेवंताबाई(७०)हिच्यासह राहत होता. अरुण यांचे वडील सैन्यात असून राजस्थान येथे राहतात. काल दुपारी त्याने आपल्या आईच्या गळ्यावर कोयत्याने वार केले व तिचा खून केला. त्यानंतर तो घराबाहेर आेट्यावर येऊन बसला शेजारी त्याची चौकशी केली असता त्याने रागाच्या भरात आपण आपल्या आईचा खून केल्याचे सांगितले.शेजाऱ्यांनी घरात पाहिले असता शेवंताबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. हा प्रकार त्यांनी दापोली पोलिसांना कळविल्यावर त्यांनी आरोपी अरुण याला काेयती सह ताब्यात घेतले.
www.konkantoday.com