राजापुरात साठवण टाकीचे काम निकृष्ट असल्याचा नगरसेवकांचा आरोप
राजापूर ः सुमारे पस्तीस लाख रुपये खर्च करून राजापूर नगर परिषद गुरववाडी येथे नव्याने बांधत असलेल्या भूमिगत साठवण टाकीचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची तक्रार अनेक नागरिक व नगरसेवकांनी केली आहे. विशेष म्हणजे हे काम दीड वर्षानंतर सुरू करण्यात आल्यानंतर तसदी न.प.चे अधिकारी घेत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
न.प.च्या विकासकामांचा उपयोग शहराला होत नसल्याचे सार्वत्रिक चित्र राजापुरातील आहे. लक्षावधी रुपयांची अनेक विकासकामे निव्वळ निधी खर्ची घालण्यासाठी झाल्याने नागरिकांचा न.प. व्यवस्थेवरील अविश्वास वाढीला लागलेला आहे, अशा कामकाजाचा उलट फटका नेहमीच शहरवासियांना बसत असल्याचा प्रत्यय यावर्षी गुरववाडी येथील पाणीपुरवठ्याच्या भूमिगत साठवण टाकीच्या कामाच्या रूपाने आला आहे.
www.konkantoday.com