पत्रकार हल्ला प्रकरण जिल्ह्यात बैठका, १० जूनला उपोषण
रत्नागिरी ः शहरात पत्रकारांवर भ्याड हल्ला करणार्या मटका जुगार अड्डेवाल्यांविरोधात संपूर्ण जिल्ह्यात पत्रकार एकवटले असून जिल्हयात विविध ठिकाणी बैठका सुरू झाल्या आहेत. या गंभीर प्रकाराची दखल येथील पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पत्रकार येत्या १० जून रोजी खेड पोलीस स्थानकासमोर आमरण उपोषण छेडणार आहे. तसे लेखी पत्रही पोलीस निरिक्षकांसह, मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री, जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहे. दि. १० जूनचे उपोषण आणि त्यापुढे ठरवायची दिशा याबाबत बैठकही जिल्ह्यातील पत्रकार खेडमध्ये घेणार आहेत.