रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध दारू व मटका प्रकरण* त्या तालुक्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करा- रविंद्र वायकर
रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये अवैध मटका,जुगार तसेच दारूचे धंदे सुरू असल्याचे आढळून आल्यास त्या तालुक्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ. प्रविण मुंडे यांना दिले आहेत.
अवैध मटका व जुगाराच्या विरोधात वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांवर करण्यात आलेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री वायकर यांनी तात्काळ रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधला. तसेच गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे कुठले अवैध धंदे सुरू असतील तर त्यावरही तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री वायकर यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहे आहेत. .
जिल्हाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतरच पोलिस अधीक्षकां समवेत घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास असे धंदे करणार्यांवर कडक कारवाई करावी,असे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार पोलिसांनी धडक कारवाई ही केली होती. परंतु रत्नागिरी जिल्हा अंतर्गत येणार्या कुठल्याही तालुक्यात पुनश्च दारूचे, मटका, जुगार अथवा अन्य अवैध धंदे सुरू असल्यास त्या तालुक्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश वायकर यांनी दिले आहेत.