चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदारांकडून जुने पाईप वापरण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी काम बंद पाडले
चिपळूण ः मुंबई-गोवा महामार्गावर सध्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. कळंबस्ते येथे एका मोरीसाठी ठेकेदार कंपनी जुनेच पाईप वापरत होती. हे ग्रामस्थांच्या लक्षात येताच माजी सभापती शौकतभाई मुकादम व अन्य ग्रामस्थांनी कंपनीच्या अधिकार्यांना धारेवर धरले. राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकार्यांना यावेळी बोलाविण्यात आले. संतप्त ग्रामस्थांनी पाईप बदलल्याशिवाय काम करू नये असे सांगून काम बंद पाडले.