सर्वसामान्यांमध्ये राहणारी, त्यांच्यात वावरणारी, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारी आणि त्यांच्यासोबत पंगतीला बसून भोजनाचा आस्वाद घेणारी नेतृत्व ही अपवादानेच आढळतात. आमदार श्री. भास्करराव जाधव हे यापैकीच एक..पाच वेळा आमदार, पक्षाचा प्रदेशअध्यक्ष ते राज्याचा कॅबिनेट मंत्री अशी यशशिखरे पादाक्रांत केल्यानंतरही त्यांचे पाय जमिनीवरच राहिले आहेत. मतदारसंघात असो वा अन्य कुठेही प्रवासात चहा-नाष्टा करायचा असेल तर आलिशान हॉटेलमध्ये न जाता एखाद्या हातगाडीवर किंवा छोट्याशा चहाच्या टपरीवरच थांबणे ते नेहमी पसंत करतात. आजदेखील गुहागरमधून परतत असताना एका हातगाडीच्या ठिकाणी थांबून त्यांनी भेळ खाण्याचा आनंद घेतला. त्याची ही छायाचित्रे.

0
112

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here