
चाळीस लाखांची फसवणूक
रत्नागिरी ः सुमारे चाळीस लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात लेखी तक्रार देवूनही पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला नाही. सावर्डा पोलीस दबावाखाली काम करीत असल्याने आपल्याला न्याय मिळत नाही अशी लेखी तक्रार दिपप्रभा शिर्के यांनी लोकशही दिनात दिले आहे. याची गंभीर दखल घेत अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब बेलदार यांनी पोलीस अधिक्षकांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.