
मुरूगवाडा ते मिर्या बंधार्याला प्रशासकीय मान्यता आ. उदय सामंत यांच्या पाठपुराव्याला आले यश
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरालगत असलेल्या मुरूगवाडा ते पांढरा समुद्र ते मिर्या दरम्यान १८९ कोटी ६७ लाख ६ हजार २०० रुपये खर्चाच्या धुपप्रतिबंधक बंधार्याच्या कामाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे मिर्यावासियांवर दरवर्षी ओढवणारे संकट दूर होणार आहे.
या बंधार्यासाठी रत्नागिरीचे आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावरही हा विषय घातला होता. त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून इतक्या मोठ्या खर्चाच्या बंधार्याला प्रशासकीय मान्यता मिळाली हे त्यांचे फलित मानले जाते.