
नरबे फाटा परिसरात ट्रक आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात ,टेम्पोमधील तिघे जण जखमी
नरबे फाटा परिसरात ट्रक आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. अपघात आज सकाळी सहा वाजता झाला या दुर्घटनेत टेम्पोमधील तिघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये फिरदोस न्यायत खले (४०), अमजत आलेमिया जांभारकर (५०) आणि मुज्जफिर अमजत जांभारकर (रा. पडवे, ता. गुहागर) यांचा समावेश आहे.
, फिरदोस खले आणि त्यांचे दोन सहकारी मिरकरवाडा जेटी येथे मासळी घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी पहाटे ४.३० च्या सुमारास जाकादेवीहून टेम्पो (क्र. एमएच-०८-डब्ल्यू-४७०३) मार्फत प्रवास सुरू केला होता. मात्र, सकाळी साडेसहा वाजता तरवळ घवाळीवाडी स्टॉपजवळ नरबे फाट्याच्या अलीकडे निवळीकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. एमएच-०९-जीजे-४३४७) त्यांच्या टेम्पोला समोरासमोर धडक दिली.
अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले




