गॅस लाईन आणि सुधारित पाणी योजनेसाठी पाडण्यात आलेले चर पावसापूर्वी बुजवावे आपुलकी संस्थेची मागणी
रत्नागिरी ः शहरात गॅस लाईन आणि सुधारित पाणी योजनेसाठी पाडण्यात आलेले चर पावसापूर्वी बुजवावे. कंत्राटदार पाईप टाकल्यानंतर चरातील भराव करीत नाहीत. पावसाळ्यात त्यामुळे रस्त्याची वाताहत होवून रस्त्याच्या बाजूने चालणे, गाड्या चालवणे, पार्किंग करणे कठीण होणार आहे. तरी पालिकेने खबरदारी घेवून कंत्राटदारांकडून चांगले काम करून घ्यावे अशी मागणी आपुलकी सामाजिक संस्थेने निवेदनाद्वारे नगराध्यक्ष बंड्या साळवी, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे केली आहे.