
आजपासून मासेबारी बंद, बंदीचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई
रत्नागिरी ः संपूर्ण देशाच्या किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश केंद्र शासनाकडून पारीत झाले असून या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर रत्नागिरी जिल्ह्यात कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रभारी सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी जिल्ह्याला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला असून या किनार्यावर ४४७१ बिगरयांत्रिकी, ओबीएम (बाहेरून इंजिन असलेल्या नौका) आणि १ ते ६ सिलेंडरच्या बोटी अधिकृतपणे मासेमारी करतात. परंतु या पावसाळ्याच्या हंगामात १ जून ते ३१ जुलै या कालखंडात माशांचे प्रजनन व्हावे यासाठी पूर्णपणे मासेमारी बंद करण्यात आली आहे. ही मासेमारी १ जून ते ३१ जुलै या कालखंडात असल्याने या काळात कोणत्याही मच्छिमार नौकांनी तसेच अन्य बोटींनी मासेमारी करू नये आणि अशी मासेमारी केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला जाणार आहे.