श्वेता जोगळेकर यांना काकासाहेब खाडीलकर पुरस्कार
रत्नागिरी ः संगीतमय नाटकात आपल्या आवाजाने ठसा उमटविणार्या रत्नागिरीच्या श्वेता हेरंब जोगळेकर यांना बालगंधर्व संगीत रसीक मंडळाच्यावतीने देण्यात येणारा काकासाहेब खाडीलकर पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पुणे येथील बालगंधर्व संगीत रसीक मंडळ गेली ४२ वर्षे संगीत रंगभूमीसाठी कार्य करीत असून संगीत नाटकांना पुन्हा उज्वळ काळ प्राप्त व्हावा यासाठी विविध उपक्रम संस्थेच्यावतीने राबविण्यात येतात. त्यामध्ये संगीत नाटके, नाट्यसंगीत, पुरस्कार वितरण आदीचा समावेश असतो. या क्षेत्रात काम करणार्या कलावंतांना पुरस्कार देण्यात येतो. या वर्षीचा काकासाहेब खाडीलकर पुरस्कार रत्नागिरीच्या सौ. श्वेता हेरंब जोगळेकर यांना जाहीर झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी जाहीर केले आहे.