ट्रक दुचाकी अपघातात एकजण ठार
रत्नागिरी ः रत्नागिरी-गणपतीपुळे रोडवर आज सकाळी झालेल्या दुचाकी व ट्रक यांच्या अपघातात एकजण ठार झाला आहे. हा अपघात रत्नागिरी-गणपतीपुळे रोडवर मासेबाव नजिक घडला आहे. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.