एस.टी., होंडासिटी अपघातात चौघेजण जखमी, एक गंभीर
रत्नागिरी ः एस.टी. बस, होंडासिटी कारमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात चौघेजण जखमी झाले असून त्यातील रणजित रमेश जाधव यांची प्रकृती गंभीर आहे. सदरचा अपघात सोमवारी हातखंबा झरेवाडी येथे घडला.
देवाचे गोठणे येथील रणजित जाधव यांच्या काकीवर अंत्यसंस्कार करून सर्वजण मुंबई उपनगरातील आपल्या घरी जात होते. रत्नागिरी-राजापूर एस.टी. बस, देवाचे गोठणे येथून मुंबईला निघालेली होंडासिटी कार यांचा समोरासमोर अपघात झाला. चालक एस. एस. मेटकरी, रणजित रमेश जाधव दीपेश मोहन कांबळे, अक्षय सखाराम कांबळे हे चौघेजण अपघातात जखमी झाले आहेत. रणजित जाधव यांची प्रकृती गंभीर असून अन्य तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.