
भोस्ते घाटातील वाढत्या अपघातामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामातील भोस्ते घाटातील सुरक्षिततेबाबत आता प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या चौपदरीकरणाच्या कामामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. घाटातील अवघड वळणावर गेल्या काही दिवसात सात लहान मोठे अपघात झाले आहेत. नुकतीच नेपाळला जाणार्या एका खाजगी बसचा भोस्ते घाटात या वळणावर अपघात झाला होता. यामध्ये सुदैवाने दरीखाली जाणारी बस अडकल्यामुळे मोठी मनुष्यहानी टळली. सध्या घाट माथ्यावरील अतीतीव्र अपघाती वळणे दूर करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे कंत्राटदार व संबंधित खाते दुर्लक्ष करीत असल्यामुळे या टप्प्यात वारंवार अपघात होत आहेत.
www.konkantoday.com