रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगार वाढले, प्रकल्प नसल्याने अनेक तरूण रोजगाराच्या प्रतिक्षेत
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षात कोणतेही मोठे प्रकल्प आले नाहीत. याउलट केंद्र शासनाने जाहीर केलेले अनेक प्रकल्प स्थानिकांच्या विरोधाने रद्द करण्यात आल्याने जिल्ह्यातील बेरोजगारीत अधिकच वाढ झाली आहे. सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना या गंभीर प्रकाराकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात ५५३६७ सुशिक्षित बेरोजगारांनी आपल्या नावाची नोंदणी केली असून त्यापैकी ४७८६ पदवीधरांना नोकरीची संधी मिळाली आहे. नावनोंदणी केलेल्यांमध्ये ३८८९४ पुरूष, १७२७३ महिलांचा समावेश आहे. इ. १० वी उत्तीर्ण झालेले १३१७८, इ. बारावी उत्तीर्ण झालेले १५४५३ अभियंता १३३५, आयटीआयमधील २०९२, डी.एड., बी.एड. धारक ११८४, कला, वाणिज्य, सायन्स शाखेतून उत्तीर्ण झालेल्या ९५४९ उमेदवारांनी आपल्या नावांची नोंदणी केंद्राकडे केली होती.