‘लाव रे तो व्हिडीओ’ ची हवा नाहीच. . .

मुंबई: ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधत राज्यभरात सभा घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांचा फारसा परिणाम झाल्याचं दिसत नाही. राज यांनी सभा घेतलेल्या जवळपास सगळ्याच मतदारसंघांमध्ये भाजपा आणि शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारल्याचं आकडेवारीमधून समोर आलं आहे.

पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना देशाच्या राजकीय क्षितिजावरुन हटवा, असं आवाहन राज यांनी केलं होतं. त्यासाठी त्यांनी नांदेड, सोलापूर, सांगली, पुणे, रायगड, शिवडी, भांडूप, शिरुर, नाशिकमध्ये सभा घेतल्या होत्या. मात्र यातील जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. दुपारी 12 पर्यंत राज्यातील 48 पैकी 44 जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार पुढे आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार तीन मतदारसंघात आघाडीवर आहेत. काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही.

Related Articles

Back to top button