
राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाच्या कारवाईत सव्वातीन लाखांचे विदेशी मद्य साठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून खेड शहरातील संत रोहिदासनगर व चाकोरे बौद्धवाडी येथे धाड घालून सव्वातीन लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त केला रोहिदासनगर येथील खेडेकर यांच्या घराच्या मागील बाजूस अतुल खेडेकर हा इसम परराज्यातील निर्मित मद्याचा व गोवा राज्यात विक्रीची परवानगी असणाऱ्या मद्याची विक्री करीत होता राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने धाड घातली असता त्यांचेकडे मोठय़ा प्रमाणावर मद्याचा साठा आढळून आला विविध ब्रँडच्या विस्कीचे ४८ बॉक्स जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सव्वा तीन लाख रुपये आहे ही बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे