कांदळवन, वाढत्या प्रदूषणकारी प्रकल्पांमुळे मासे नष्ट
रत्नागिरी ः कोकण किनारपट्टीवर प्रदूषणकारी प्रकल्पाची रांगच आहे. सागरमाला अंतर्गत महामार्ग बंदरांचा विकास होत आहे. यातून मासेमारी क्षेत्र कमी होत आहे. कांदळवन तोड मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा परिणाम म्हणून किनार्यालगत मासे नष्ट होत आहेत. हे पारंपारिक मच्छिमारांना पटवून द्या, जेणेकरून पर्ससीन व पारंपारिक मच्छिमारांमधील संघर्ष कमी होण्यास मदत होईल असे आवाहन पर्ससीन नेट मच्छिमार नेते गणेश लाखण यांनी नौका मालकांच्या मेळाव्याप्रसंगी केले.
सर्व गोष्टींना सरकार जबाबदार आहे. आपली आपली मते सांभाळण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जातात. मात्र त्याचा अभ्यास केला जात नाही. शासनाने निर्णय घेताना त्या क्षेत्रातील जाणकारांना विश्वासात घेतले पाहिजे. मात्र असे होत नाही. न्याय हवा असेल तर संघटीत होणे गरजेचे आहे. आता सर्व पर्ससीननेट मालक एकत्र आले आहेत. आता सरकारला आम्हाला न्याय द्यावाच लागेल असेही त्यांनी सांगितले.