
आता लुटा पूर्णगडमध्ये बॅकवॉटर सफारीची मजा
रत्नागिरी पूर्णगड येथील मूळचे जयेश पाथरे यांच्या स्वामी इव्हेंट्स यांनी नुकतेच पूर्णगड खाडीमध्ये बॅकवॉटर सफारीचे आयोजन केले होते.१२ मे रविवारी या सफरीचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये मोठ्या संखेने लोक सहभागी झाले होते.या बॅक वॉटर सफारीमध्ये बोट सफारी सोबत तुम्ही जेवण व स्टार्टर्स यांचा आनंद लुटू शकता.
सध्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच निसर्ग सौंदर्यामध्ये वेळ घालवायला आवडतो.कोकणामध्ये मोठय़ा प्रमाणात लोक निसर्गाच्या सानिध्यात राहायला येत असतात.त्यातच स्वामी इवेंट्स मुळे लोकांना पूर्णगडाच्या खाडीमध्ये बोट सफारीचा आनंद आता लुटता येणार आहे.
बॅकवॉटर सफारीचे शुल्क हे रुपये ७५० प्रत्येकी असे असून यात बोट सफारी, कोल्ड्रिंग, स्टार्टर्स अनलिमिटेड जेवण आणि येण्या जाण्याचा खर्च समाविष्ट आहे.लवकरच पुन्हा एकदा बोट सफरीचे आयोजन करण्यात येणार असून त्याचे बुकींग देखील सुरू झाले आहे.अधिक माहितीसाठी तुम्ही खालील आयोजकांच्या नंबरवर संपर्क करू शकता ८८०५२४०७०६,९५२७७७९७९५