
जिंदाल कंपनीने जयगड दशक्रोशीतील ११४ मुलींना मिळवून दिली नोकरी
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्याला विकासाचे द्वार प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ओपी जिंदाल ट्रेनिंग सेंटरने खुले केले आणि जयगड दशक्रोशीतील ११४ मुली, महिलांना नोकरीही दिली आहे.
संगीता जिंदाल यांच्या संकल्पनेतून ओपी जिंदाल ट्रेनिंग सेंटर जयगड येथे उभारण्यात आले. यातून मुलींसाठी विविध कोर्स सुरू करण्यात आले. त्यातील ११४ मुलींना नोकरीही देण्यात आली, असे सी.एस.आर.चे हेड अनिल दधीच एच. आर. प्रतिज्ञा संसारे, बीपीचे हेड कैवल्प पेढे यांनी सांगितले. या सेंटरमधून १७५ मुली पुढील नोकरीसाठी तयार झाल्या. काहींना महाराष्ट्रातील बेलारी, डोलवी, नागपूर आणि रत्नागिरी या ठिकाणी त्यांनी नोकरी पत्करली आहे.