सॅफरॉनच्या गुंतवणूकदारांची निराशा

0
360

काही वर्षांपूर्वी रत्नागिरीत उगवलेल्या सॅफरॉन या कंपनीच्या भुलथापांना बळी पडून अनेक रत्नागिरीकरांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती मोठमोठी आमिषे दाखवणाऱ्या या कंपनीने ऐनवेळी पळ काढला होता त्यामुळे रत्नागिरीकरांच्या खळबळ उडाली होती याबाबत अनेक गुंतवणूकदाराने रत्नागिरी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या याशिवाय न्यायालयातही याबाबत खटला दाखल झाला आहे आज ना उद्या आपले गुंतवलेले पैसे मिळतील अशी आशा गुंतवणूकदारांना होती त्यातच काल एका स्थानिक वृत्तपत्रात संचालकांच्या नावाने गुंतवणूकदारांसाठी एक जाहिरात देऊन गुंतवणूकदारांचे पैसे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र यांच्या वृत्तपत्रात कंपनीच्या संचालकांच्या वतीने अशी कोणतीही जाहिरात आपण दिली नसल्याचे जाहीर करण्यात आले होते आपणाला बदनाम करण्यासाठी कोणीतरी खोडसाळपणा केल्याचे जाहिरातीत खुलासा करण्यात आला होता तरी देखील काही गुंतवणूकदारांनी आपल्याला पैसे मिळतील या आशेने जाहिरातीत सांगितलेल्या जागेवर गर्दी केली होती परंतु प्रत्यक्षात तेथे कंपनीचे कोणी संचालक फिरकले नसल्याने गुंतवणूकदारांची मात्र निराशा झाली या कंपनीविरोधात न्यायालयात खटले दाखल असून न्यायालयाकडून आपल्याला न्याय मिळेल अशी आशा गुंतवणूकदारांना आहे