
मालवण पुतळा दुर्घटनेतील ‘चेतन पाटील’ला जामीन!
मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या चेतन पाटील याला उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठाने पाटील याला २५ हजाराचा जामीन मंजूर केला.
मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर सोमवारी (ता. २५) सुनावणी होणार आहे.राजकोट किल्ला परिसरात उभारलेला शिवपुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेने पुतळा उभारणीचे काम निकृष्ट झाल्याचे उघड झाल्यानंतर जयदीप आपटेला ४ सप्टेंबर रोजी कल्याण येथून अटक झाली तर सहआरोपी चेतन पाटील याला ३० ऑगस्टला अटक केली होती.सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने या दोघांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात या दोघांनी जामिनासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पाटील याची २५ हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका केली.